spot_img
spot_img

प्रवरेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड नोकरी देण्यात महाविद्यालय अव्वल स्थानावर

लोणी दि.८( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोणी येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली.
यामध्ये आर्किटेक्ट सचिन सुतार, पुणे येथे एक विद्यार्थी, अॅक्सी डिझाईन कन्सलटन्ट, पुणे येथे एक विद्यार्थी, डिझाईनर पीपल्स, नाशिक येथे एक विद्यार्थी, स्पेस डिझाईनर, नाशिक येथे दोन विद्यार्थी, क्रियेटिव्ह कन्सेप्ट्स, अहमदनगर येथे एक विद्यार्थी, मेल्ड स्पेस, अहमदनगर येथे एक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशी माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.
   प्लेसमेंट सुरु करणारे प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोणी हे प्रथम आर्किटेक्चर कॉलेज असून उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोणी. प्लेसमेंट ची परंपरा सुरु करू शकले आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी सांगितले. प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले गेले. प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोणी हे १९९६ साली सुरू झाले असून पुणे विद्यापीठाशी संलग असून आतापर्यंत सुमारे सातशे विद्यार्थी पास आऊट झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थी देशातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत व काही विद्यार्थी देशातील विविध भागात आर्किटेक्ट म्हणून स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयामध्ये आयोजित होणाऱ्या एक्सपर्ट लेक्चर, गेस्ट लेक्चर, ईनटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट इत्यादी उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
    
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी प्राचार्या तेजश्री ठाणगावकर, डाॅ.मनोज परजणे,प्रा. जय क्षत्रिय, प्रा. कपिल बुऱ्हाडे, प्रा. तुषार पारिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. चारुता सोनपरोते, तसेच सर्व स्टाफ मेंबर्स यांनी परिश्रम घेतले.
  
 विद्यार्थ्यांच्या या प्लेसमेंट बाबत संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव मा. भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!