शिर्डी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमिताने नगर जिल्ह्यात येत असले तरी,त्यांचा दौरा एकूणच नगर नासिक मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकार पाठबळ देवून कशी मदत करणार याची उत्सुकता आहे.
गेली अनेक वर्षे नगर नासिक आणि मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाची चर्चा होत आहे.त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाण्याचा वाद अधिकच वाढत चालला आहे.न्यायालयीन प्रक्रीया याबबात सुरू आहे.यंदा तर पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिली.नगर नासिक मध्ये दुष्काळाचे सावट आहे.जायकवाडी मध्ये पाणी नसल्याने समन्यायी कायद्याचा आधार घेवून पाणी सोडण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत.परंतू ही परीस्थीती कायम स्वरुपी बदलण्यासाठी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात पश्चिम वाहीनी नदयाचे वळविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.
याबाबत लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील स्व.गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परीषदेच्या माध्यमातून याबाबत प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावरूनच नदीजोड योजना देशात राबविण्याबबात केंद्र सरकारने निर्णय केला.आता राज्य सरकारने याबाबत सुरू केलेली कार्यवाही महत्वपूर्ण म्हणावी लागेल.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेला मंजूरी दिली.मात्र अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही.आता पुन्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार सतेवर आल्यानंतर नदीजोड प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्य सरकारने नगर नासिक आणि मराठवाड्याच्या दुष्काळी परीस्थितीचे चित्र बदलविण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न उपयुक्त ठरणार आहेत.
गुजरात सरकारने या योजनला गती दिली. राज्य सरकारही त्या दिशेने करीत असलेली वाटचाल पाहाता पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडून या प्रकल्पाबाबत काही घोषणा होते का याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.



