श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा) :-अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कारेगाव भाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीने ऊस तोडणी गाडीवान व मजुरांची अपघाती विमा उतरविला आहे. चाळीसगाव भागातील ऊसतोडणी गाडीवान बापू दशरथ गायकवाड यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांचा तिन लाखाचा अपघाती विमा क्लेम मंजूर झाला.सदर मंजूर तीन लाख रकमेचा धनादेश कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांचे हस्ते वारस पत्नी श्रीमती बेबाबाई बापू गायकवाड यांना सुपूर्द करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक कारखाना कार्यस्थळावर २०१९-२० चे गाळप हंगामात चाळीसगाव येथील बापू दशरथ गायकवाड हे ऊस तोडणीसाठी आले होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारेगाव भाग कंपनीने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता विमा कंपनीकडे केली होती. त्यावर विमा कंपनीने रुपये तीन लाख रकमेचा क्लेम मंजूर केला आहे. याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, कारेगाव भाग संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख, अशोक राऊत, गणेश लेलकर, योगेश लेलकर गाडीवान कंत्राटदार हिरामण रुपला पाटील आदी उपस्थित होते.



