11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकळीभान येथील ग्रामपंचायतमध्ये माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांची जयंती साजरी

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा  ):- श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे  यांची जयंती टाकळीभान ग्रामपंचायतच्या स्व.गोविंदराव आदिक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

    
 माजी आमदार जयंतराव ससाणे  यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या गावासाठी भरघोस निधी दिल्याने मोठा विकास साधला गेला आहे. तसेच ससाने यांचे या गावावर राजकारणा पलीकडे प्रेम होते. त्यामुळे येथे त्यांची जयंती व पुण्यतीथी साजरी केली जाते.
          आज त्यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत सभागृहात प्रतिमेची विधीवत पुजा करुन जेष्ठ नागरीक विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त गंगाधर गायकवाड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
       
 यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, बाबासाहेब बनकर, दत्तात्रय नाईक, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, विलास दाभाडे, शंकरराव पवार, रावसाहेब वाघुले, संत सावता सोसायटीचे चेअरमन प्रकाश दाभाडे, सुनिल बोडखे, सुनिल त्रिभुवन, महेंद्र संत, भाऊसाहेब पटारे, श्रीधर गाडे, बाळासाहेब आहेर, बाबासाहेब तनपुरे, बापुसाहेब शिंदे, गोटीराम दाभाडे, संदिप बनकर, बाबासाहेब दाभाडे, पंढरीनाथ बिरदवडे, मोहन रणनवरे, गणेश गायकवाड, मोहन रणनवरे, बाबासाहेब लोखंडे आदींसह समर्थक उपस्थित होते.
                        
माजी सभापती नानासाहेब पवार भाजपात गेले असले तरी त्यांच्या संपर्क कार्यालयात माजी आ. जयंतराव ससाणे  यांची प्रतिमा पुर्वीपासूनच असल्याने पवार यांच्या कार्यालयातही ससाने यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नानासाहेब पवार, शिवाजी धुमाळ, रावसाहेब मगर व पवार समर्थक उपस्थित होते.
                      
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!