लोणी दि.६ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-शिक्षणातून आदर्श पिढी घडविण्याचे काम होत असून इंग्रजी शिक्षण देत असतांना आपली संस्कृती जपण्याचे काम प्रवरेच्या शाळा मधून होत असल्याने येथील विद्यार्थी हा सर्वच क्षेञात आघाडीवर आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुसण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा ५९ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ. बी.बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के.टी अडसूळ, पर्यवेक्षक सौ. एम.एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ.विखे पाटील यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा परिचय देतानाच राज्यात खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करुन शेतकरी आणि सामान्य जनतेच्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण दिल्याने ग्रामीण मुले सर्वच क्षेञात आघाडीवर असून अनेक माजी विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदावर आहे हेच स्वप्न शाळेच्या माध्यमातून पुर्ण होतांना विशेष आनंद आहे. शाळेची विद्यार्थिनी कु.पियुषा मते आणि शाळेचे सहशिक्षक श्री. एम.बी अंञे यांची भाषणे झाली. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमधील गुणवंतांचा व बारावी सामाईक प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. .यानिमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केलेले होते. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजनात्मक खेळ उपस्थितांसाठी आकर्षण ठरले. तर माध्यमिक विभागात संगीत खुर्ची, थ्रो बॉल, रस्सीखेच, शिक्षक व विद्यार्थी क्रिकेट सामना,असे मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी खांदे हिने तर आभार प्रदर्शन राजवर्धन घोलप यांने केले.




