अहमदनगर (जनता आवाज
वृत्तसेवा ):- अहमदनगर येथील महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून त्यातील सात लाख रुपये निधी बाकी आहे असे सांगण्यात आले.
महापालिकेच्या घन कचरा विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून त्यात सात लाख निधी बाकी आहे असे उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने शासनाकडे सादर केले आहे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी चार कोटी खर्च झाल्याचे नसल्याचे ऑनलाइन प्रणालीवर उघडकीस आले आहे. यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी घनकचरा विभाग प्रमुख सह स्वच्छता निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
परंतु प्रमुखासह दोघांना ही नोटीस बाजारात आलेली आहे. परंतु याची अंमलबजावणी कधी होणार हे पाहावे लागेल. कारण महानगरपालिकेमध्ये असे अनेक प्रताप वेळोवेळी निदर्शनात आले. परंतु कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. नोटीस बजावणी झालेले अधिकारी नावे घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख, स्वच्छता निरीक्षक परीक्षित बिडकर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांना खुलासाही करायला लावला आहे.




