मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ):- तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्या रूपाने मोठ राजकीय वादळ आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेत सामील झाले. ते सत्तेत सामील होताच शिंदे शिवसेना गटात त्याचबरोबर उद्धव शिवसेना गटात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघेजण एकत्र येणार का? मनसे नेते अभिजीत पानसे व संजय राऊत यांच्या चर्चा
त्यामुळे काळाची गरज व महाराष्ट्रातील शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये आता तरी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे. असे आशयाचे राज्यभर फलक लावण्यात आले. याच गोष्टीचा पदर धरून आज राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणायला हवी. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेकडून ठाकरे गटाला युतीसाठी प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अभिजीत पानसे – संजय राऊतांचा, भांडुप ते प्रभादेवी कारमधून एकत्र प्रवास केला. त्यानंतर आता या चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पानसे यांच्या भेटीनंतर संजय राऊत तातडीने मातोश्रीवर पोहोचले आहेत. अभिजीत पानसे यांनी घेऊन आलेल्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधु एकत्र यावे बाबात दोन्ही पक्षातील नेते सकारत्मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे बंधू जर एकत्र आले. पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळेल अशी उपेक्षा केली जात आहे.




