साञळ दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सात्रळ येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कु. श्रद्धा भाऊसाहेब गागरे ही एफ. वाय. बी. ए. वर्गात शिकत आहे. ती कानडगाव (ता. राहुरी) येथे राहते. बिबट्याने अचानक केलेल्या हल्यात कु. श्रद्धा भाऊसाहेब गागरे पाटील या १९ वर्षाच्या बहिणीने आपल्या मोठ्या भावाला बिबट्याच्या हल्यातून ती स्वतः जखमी असताना वाचवले. तिच्या डाव्या मांडीला बिबट्याच्या दोन नख्या लागलेल्या आहेत. अशा अवस्थेतही ती जखमांची वेदना सहन करत विद्यापीठ परीक्षा दिली.तिच्या या धाडसाचे कौतुक रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
कु. श्रद्धा व तिचे मोठे दोन भाऊ फोटोग्राफर कुणाल भाऊसाहेब गागरे पाटील व तेजस भाऊसाहेब गागरे पाटील हे लोणीहून फोटो श्री. दत्तात्रय नामदेव विखे पाटील मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने कानडगावला रात्री मोटरसायकलने येत होते. घराच्या अगदी जवळ असताना गिन्नी गवतातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्या हल्ल्यात ते तिघेही मोटरसायकल वरून खाली पडले. मोटरसायकल दुसरा मोठा भाऊ तेजस चालवीत असल्याने तो थोड्या अंतरावर जाऊन पडला या काळ्याकुट्ट अंधारात कु. श्रद्धा हिच्यावर बिबट्याने पंजाचा मारा केल्यामुळे ती जखमी झालेली होती. खाली पडलेली होती पण आपला मोठा भाऊ कुणाल हा बिबटच्या अगदी समोर पडलेला होता अशा या काळ्याकुट्ट अंधारात कोणतेही हत्यार नसताना प्रसंगवधान राखून कुणाल याने बिबट्याच्या अंगावर, डोळ्यावर हातात आलेल्या मातीचा मारा केला.
आपला भाऊ बिबटच्या समोर पडलेला पाहून तिनेही जखमी असताना पळत जाऊन त्याच्यावर मातीचा मारा केलाा त्यांनतर पुढे अंधारात पडलेला दुसरा मोठा भाऊ तेजस हा पळत आला त्याने नंतर बिबट्यावर ढेकूळ, दगड यांचा मारा केला खूप वेळ, खूप मोठा आरडा आरोड झाल्यामुळे आजूबाजूचे वस्तीवरचे लोक पळत आले तेवढ्या वेळात बिबट्या तिथून पसारा झाला.वेळेचे भान राखून आपल्या भावाचे रक्षण करणारी श्रद्धा ही खरच आपल्या भावाची पाठीराखीण ठरली ही घटना अंगावर शाहारे आणारी असून तिचे हे धाडस मुलीसाठी प्रेरणादायी आहे असे सौ.धनश्रीताई विखे पाटील यांचे कौतुक करत प्रवरा परिवारांच्या वतीने गौरव केला.




