लोणी दि.५ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वाणिज्य आणि व्यवस्थापन या शाखेतील नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी राजकिय कुंटूंबामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये मनुष्यबळ व व्यवस्थापना मध्ये येणाऱ्या अडचणी व समस्या या विषयावर प्रामुख्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, अहमदनगर या संस्थेबाबतचा आपला प्रबंध सादर केला.
डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी तीन ते चार वर्षे मनुष्यबळ व्यवस्थापन व विकासाचे काम यशस्वीरीत्या हाताळले आहे. कामकाजा दरम्यान या विभागाबाबत अनेक प्रकारच्या अडचणी, गुंतागुंत, विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत होत्या. त्यावर योग्य तो निर्णय व पर्याय सुचविण्यात त्यांचा हातखंडा आहे. याप्रकारच्या समस्यावर कायमस्वरूपी काहीतरी सुयोग्य पर्याय व सुटसुटीतपणा उपलब्धतता निर्माण करण्याचा त्यांचा मानस होता. यामुळे डॉ. सुस्मिता विखे यांनी याविषयावर प्रबंध सादर करण्याचा निर्णय केला. २०२० पासून त्यांनी यावर संशोधन करून काही वैयक्तिक बाबींवरदेखील खोलवर तपासणी करून माहीती घेतली. नुकतेच त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रंबध सादरीकरण झाले. यावेळी गुजरात येथील श्री गोविंद गुरू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रतापसिंह चौहान, पुणे विद्यापीठातील एमबीए विभाग प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील उपस्थित होत्या.
त्यांना आयबीएमए अहमदनगर येथील डॉ. अरूणा इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे सर्व अधिकारी, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




