spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा म्हणून कोल्हार भगवतीपुर येथे साखळी उपोषणास प्रारंभ

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा आरक्षणासाठी कोल्हार भगवतीपुर येथे साखळी उपोषण करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आजपासून कोल्हार भगवतीपुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. या उपोषणात कोल्हार व भगवतीपुर येथील समस्त ग्रामस्थ व मराठा सकल मोर्चा यांनी सहभाग नोंदवला आहे.

काल कोल्हार भगवतीपुर येथे मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये ग्रामस्थांच्या बरोबरीने तरुण वर्ग व महिलानी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर चिमुकल्यानी  सुद्धा सहभाग घेतला होता.

या साखळी उपोषणामध्ये सहभाग म्हणून १३ जण आज उपोषणाला बसले आहेत. उपोषणार्थींची म्हणून

१ . शरद चंद्रकांत खर्डे

२ . वसंत दत्तात्रेय खर्डे

३ .अजित रमेश मोरे

४ . शरदचंद्र बबनराव खर्डे

५ . दिलीप जयराम शेळके

६ .गणेश संजय राऊत

७ . सागर राजेंद्र मोरे

८ . प्रमोद कैलास खर्डे

९ . जितेंद्र विष्णुपंत खर्डे

१० . ॲड.उदय भगवंतराव खर्डे

११ . प्रशांत रामराव खर्डे

१२ . मयूर तात्यासाहेब कडस्कर

१३ . गणेश विष्णुपंत निबे

१४. अरुण शिवाजीराव फोपसे

हे सर्व साखळी उपोषणास बसले आहेत. या साखळी उपोषणास कोल्हार व भगवतीपुर परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात उस्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!