11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

धाडसी श्रद्धाचा उषाताई तनपुरेंनी केला सन्मान;बिबट्याच्या हल्ल्यातुन भावंडांची केली होती सुटका

राहुरी ( जनता आवाज

वृत्तसेवा ):- बिबट्याच्या तावडीतून आपल्या भावंडांना वाचविणाऱ्या श्रद्धा गागरे हीच्या कुटुंबीयांचा जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य , माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांनी कानडगाव येथे जाऊन सत्कार केला. 

         

 कानडगाव येथे राहणाऱ्या श्रद्धा भाऊसाहेब गागरे हिने मागील आठवड्यात बिबट्याच्या तावडीतून आपले बंधू कुणाल व तेजस यांना वाचविले होते . श्रद्धा गागरे हिच्या धाडसाचे कानडगावसह सर्वत्र कौतुक करण्यात आले . या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या व राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांनी आज कानडगाव येथे जाऊन गागरे कुटुंबीयांची भेट घेतली . यावेळी श्रद्धा हिच्या धाडसाचे सौ. तनपुरे यांनी कौतुक केले . श्रद्धा हिचे बंधू कुणाल व तेजस यांच्या प्रकृतीचीही त्यांनी चौकशी केली. 
यावेळी भाऊसाहेब गागरे व कुटुंबीयांचा सौ तनपुरे यांनी यथोचित सत्कार केला . यावेळी डॉ. रवींद्र गागरे, सोपानराव हिरगळ (सर ) , प्रभाकर धोंडे , पांडूभाऊ लोंढे , मच्छिंद्र गागरे , एकनाथ गागरे , किरण गागरे , जावेदभाई सय्यद , सिताराम गागरे , अण्णा नेहे , रामकिसन गागरे , पोपटराव गागरे , भाऊसाहेब रंगनाथ गागरे , आण्णा नेहे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!