टाकळीभान ( जनता आवाज वृत्तसेवा ):– येथील स्थापनेच्या गेल्या १५ वर्षांपासुन सतत शंभर टक्के कर्जाची वसुली करीत आसलेल्या व सभासद शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या संत सावतामाळी वि.वि.कार्य. सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी बाबासाहेब रघुनाथ लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा चेअरमनपदी लांडगे चंद्रकांत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. निवडणुक निर्णय आधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरीष्ठ लिपिक राजेश जोशी यांनी निवड घोषित केली.
टाकळीभान येथे स्व. माजी आ. जयंतराव ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या व स्व भाऊसाहेब दाभाडे व स्व. एकनाथ लोखंडे यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यरत आसलेल्या श्री संत सावतामाळी वि.वि.कार्य. सेवा सहकारी सोसायटीचे कामकाज गेली १५ वर्षे सुरु आहे. स्थापनेपासुन संस्था सातत्याने शंभर टक्के कर्जाची वसुली करुन सभासद शेतकऱ्यांना सेवा देत आहे. दरवर्षी प्रत्येक सदस्याला चेअरमनपदाची संधी देण्याचा पायंडा संस्थेत असल्याने मावळते चेअरमन प्रकाश दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काल मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरीष्ठ लिपिक तथा निवडणुक निर्णय आधिकारी राजेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडाली. या बैठकित बाबासाहेब रघुनाथ लोखंडे यांचा एकमेव आर्ज आल्याने लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी जोशी यांनी जाहीर केले. संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे, छोटु बनकर, रवि शिरसाठ यांनी निवडीकामी सहकार्य केले.
यावेळी संस्थेचे संचालक चंद्रकांत लांडगे, बाबासाहेब लोखंडे, प्रकाश दाभाडे, बाबासाहेब बनकर, बाबासाहेब तनपुरे, विलास दाभाडे, नानासाहेब रणनवरे, शिवाजी शिरसाठ, रावसाहेब गायकवाड, विद्याताई दाभाडे, इंदुबाई लोखंडे, उषा दाभाडे आदि संचालक उपस्थित होते. निवडी प्रसंगी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, अशोकचे माजी संचालक दत्ताञय नाईक, प्रा.कार्लस साठे, भारत भवार, अबासाहेब रणनवरे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, बापुसाहेब शिंदे, ग्रामिण विद्यालयाचे अध्यक्ष रघुनाथ लोखंडे, गगोटीराम दाभाडे, मधुकर गायकवाड, सुनिल बोडखे, डाॕ. भाऊसाहेब लोखंडे, संस्थेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते.



