नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कै सौ सुंदर बाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय, नेवासा,मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री आर जी गारोळे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि विद्यार्थी दशेमध्ये वक्तृत्व कला जोपासणे अत्यावश्यक आहे याचे प्रतिपादन केले.
कै. सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
पाचवी ते बारावीच्या अनेक विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. इयत्ता दहावी अ च्या विद्यार्थिनींनी हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प आणि एक पेन देऊन सत्कार केले. सूत्रसंचालनापासून ते आभार प्रदर्शन पर्यंत सर्व काम इयत्ता दहावी अ च्या विद्यार्थिनींनी केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस जी पानसरे , पर्यवेक्षक आर जी चौधरी , विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




