spot_img
spot_img

प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यायातील’ कॉम्प्युटर व आय टी विभागातील सहा विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सहा मुलींची निवड झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.

यामध्ये साक्षी अग्रवाल, स्नेहा कुटे, अपूर्वा जाधव, नेहा शिंदे, निशा वराडे आणि मोबिन शेख या विद्यार्थ्यांची नेट्विन इन्फो नाशिक, साईन टेक प्रा. लि. बेंगलोर, एशियन हार्ट इन्स्टिट्युट मुंबई, व ट्रोन सॉफ्ट टेक पुणे या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली अस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सध्या शेवटच्या वर्षांत असून काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये निवडण्यात झाली असून सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाविद्यालयात मुलाखती घेतल्या. कंपनीने परिसर मुलाखती घेण्यासाठी प्रवरा ग्रामीण अभियांञिकीला पसंती दिली आहे.

महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांत ६.५० लाखांपर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे परिसरातून कौतुक होत आहे

ट्रोन सॉफ्ट टेक प्रा. लि. पुणे या कंपनीतर्फे राजश्री कुंजीर व सोबत आलेल्या टीमने महाविद्यालयाच्या विद्यार्थांची निवड केली. राजश्री कुंजीर ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाची माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्याया तर्फे होत असलेले नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह व उत्कृष्ट पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मिनिनाथ बेंद्रे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सचिन कोरडे तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. सागर महाजन व आय टी विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. दिपक साळुंखे यांनी प्रयत्न केले आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील , खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, डीन अडमीन डॉ. सुनील मिसाळ, डीन अकॅडमी डॉ. शकील शेख, पॉलिटेकनिक कॉलेज चे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजेंद्र निंबाळकर सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.

प्रवरेचा सर्व परिसर हा आम्हा मुलीसाठी सुरक्षित आहे.शिळणांसोबत विविध उपक्रम आणि प्रक्षेञ भेटीतून परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो.यामुळे हे यश आम्हा मुलीसाठी महत्वपुर्ण आहे.  – साक्षी अग्रवाल

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!