कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोल्हार भगवतीपुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषणात कोल्हार व भगवतीपुर येथील समस्त ग्रामस्थ व मराठा सकल मोर्चा यांनी सहभाग नोंदवला आहे.
कोल्हार भगवतीपुर येथे मराठा समाजाच्या .या साखळी उपोषण साठी कोल्हार भगवती शेजारील कडीत बु, कडीत खु, मांडवे, रामपूर, उक्कलगाव, डुक्रेवाडी, येथील सर्व समाजातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला. हुतात्मा दत्तात्रय भोगे, हुतात्मा सागर वाळे या मराठा आरक्षण साठी बलिदान दिलेल्या बांधवांना रोज सकाळी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जाते व त्यानंतर उपोषणास सुरुवात केली जाते.सहभाग म्हणून १२ जण रोज उपोषणाला बसतात .
उपोषणार्थींची नावे
१ . साईनाथ बाबासाहेब खर्डे
२ . श्रीकांत दशरथ खर्डे
३ . स्वप्निल सुरेश निबे
४ . सुभाष अर्जुन खर्डे
५ . ऋषिकेश सुनील खांदे
६ . संदीप वसंतराव खर्डे
७ . अक्षय रवींद्र मोरे
८ . रोहन चंद्रकांत पाटोळे
९ . दत्तात्रेय कारभारी राजभोज
१० . जितेंद्र विष्णुपंत खर्डे
११ . शरद खर्डे
१२. धनंजय बाबासाहेब दळे
हे सर्व साखळी उपोषणास बसले आहेत. या साखळी उपोषणास कोल्हार व भगवतीपुर परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात उस्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
मराठा महिला साखळी उपोषणात सहभागी होणार कोल्हार भगवतीपुर येथील मराठा माता भगिनींनी आंदोलकांशी चर्चा करून एक दिवस आम्हाला साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी द्यावे अशी विनंती वजा मागणी केली आहे.त्यानुसार मराठा माता भगिनींसाठी एक दिवस राखीव ठेवून रविवार हा दिवस त्यांना देण्यात आला. महिलांचा उत्स्फूर्त नाव नोंदणीसाठी प्रतिसाद पाहून पुढील रविवारी पाच- सोमवार सहा तारीख होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवार दि.०५/११/२०२३ हा दिवस कोल्हार सकल मराठा समाजाच्या सर्व महिलांसाठी राखीव केला आहे. कोल्हार भगवतीपुर मराठा समाजाच्या सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत …
एक मराठा… लाख मराठा



