11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

अजित पवार यांना महसूल खाते दिले जाण्याची शक्यता

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- रविवारच्या शपथविधीनंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यावेळेस सर्व मंत्रीगण उपस्थित होते. यात कोणाला कोणते मंत्रिपद द्यायची याची चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील त्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यात अजित पवार यांना महसूल खाते दिले जाणार आहे. दिलीप वळसे यांना सांस्कृतिक तर छगन भुजबळ यांना ओबीसी खाती देणार असल्याचे वृत्त आहे. हसन मुश्रीफ यांना कामगार खाते मिळणार असल्याचे वृत्त आहे..टिव्ही 9 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील सध्या यांच्याकडे महसूल खाते असून ते भाजपमधील वरिष्ठ व मातंबर असे नेते आहेत.

 एक वर्षापूर्वी शिंदे गट हा शिवसेनेतून बंड करून गुवाटीला गेला असता त्यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सातत्याने शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन करण्यामध्ये नामदार  राधाकृष्ण विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भाजपा हे विखे यांना नाराज  करणार नाही.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!