spot_img
spot_img

मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांची आढावा बैठक संपन्न.

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची महत्वाची बैठक महाराष्ट्राचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने ग्रामपंचायत कर रद्द बाबत, पोल्ट्री व्यवसायासाठीचे वीज बील शेती पंपाच्या प्रमाणे आकारणे बाबत,

पोल्ट्री व्यवसायासाठी एकाच वेळी ग्रामपंचायत एन. ओ. सी. देण्यात यावी, पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदानीत सौरऊर्जा प्रकल्प उपलब्ध करून देणे बाबत, कंपन्यांनी केंद्र शासनाच्या कॉन्ट्रॅक्ट गाईडलाईन निर्गमित करणे बाबत, कंपन्यांनी खाद्याची गुणवत्ता चाचणी व खाद्य बॅगवर कन्टेन्ट असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी (MECC) च्या कार्यप्रणालीबाबत माहिती सादर करणे, शालेय पोषण आहारामध्ये अंडीचा समावेश करणे बाबत, तसेच पशुसंवर्धन विभाग जिल्हा आयुक्त व राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर कुक्कुटशाळेच्या माध्यमातून पोल्ट्रीशेड नोंदणी प्रमाणपत्र व पोल्ट्री विषयी पोल्ट्री फार्मर्समध्ये जनजागृती करण्यात यावी. वरील सर्व विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मा. मंत्री विखे पाटील साहेब यांनी उपस्थितांना दिले

यामध्ये पशुसंवर्धन सचिव मा. श्री तुकाराम मुंडे साहेब, आयुक्त श्री हेमंत वसेकर यांनीही पोल्ट्री व्यवसायासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे सागितले. तसेच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य श्री सुदर्शन पोकळे, श्री धनंजय आहेर, श्री एकनाथ मुंगसे, श्री अनिल खामकर, श्री शरद गोडांबे, श्री पंढरीनाथ सावळे, श्री शुभम महल्ले, श्री रवींद्र मेटकर, सौ प्रियंका थिगळे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेण्यात येणाऱ्या सकारात्मक धोरणाबद्दल मंत्री विखे पाटील साहेबांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!