कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):- माणसाच्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका काय आहे हे आपण सारेच जाणतो आहोत,आपल्या संस्कृतीत डॉक्टरांना देव मानले जाते.डॉक्टरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ बी.सी.रॉय यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने १९९१ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला.
समाजसेवेसाठी अथक परिश्रम घेणारे ते एक प्रसिद्ध डॉक्टर होते. ४ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले,अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.याचाच भाग म्हणून कोपरगावातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे व कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स डे ‘मुळे हॉस्पिटलला’ भेट देऊन साजरा केला.
विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल संदर्भातील सर्व बाबी उत्सुकतेने जाणून घेतल्या.या मध्ये ओपीडी,आयपीडी,कॅझुअल्टी,पॅथॉलॉजी लॅब,एक्स रे,आयसीयु ऑपरेशन थिएटर आशा विविध विभागाची माहिती हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच विविध मशीनच्या माध्यमातून बीपी,शुगर,पल्स रेट, ऑक्सिजन लेवल कसे तापसतात याचे प्रात्यक्षिक हॉस्पिटलचे सहाय्यक डॉ.तेजस नरोडे यांनी करून दाखवले. यावेळी कोपरगावात विद्याकीय क्षेत्रात नावलवकिक असलेले डॉ.दत्तात्रय मुळे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या यशाचा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच त्यांचा ४० वर्ष या क्षेत्रात असलेला अनुभव,त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात केलेले अथक परिश्रम व संघर्ष विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांना डॉक्टर होण्यासाठी करावा लागणाऱ्या अभ्यासाचे अमूल्य असे मार्गदर्शन देखील केले.
तसेच संस्थेच्या व शाळेच्या वतीने विशाल झावरे व मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी डॉ.डीएस मुळे सर यांचा व त्यांच्या सर्व सहाय्यक डॉक्टर्सचा भेट वस्तु देऊन सन्मान केला. सर्व विद्यार्थ्यांनी डॉ.उषा गवळी, डॉ.काजल जगदाळे व हॉस्पिटल मध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर्सना व नर्सेसला डॉक्टर डे च्या शुभेच्छा दिल्या. या वेळी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




