spot_img
spot_img

सर्वाना बरोबर घेऊन राजकारणाच्या माध्यमातून गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडवितानाच, त्यांच्या आनंदात सहभागी होणे हाच उद्देश विखे पाटील कुटुंबीयाने अनेक वर्ष जोपसला- खा. डॉ. सुजय विखे पाटील

लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा ):-सर्वाना बरोबर घेऊन राजकारणाच्या माध्यमातून गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडवितानाच, त्यांच्या आनंदात सहभागी होणे हाच उद्देश विखे पाटील कुटुंबियाने अनेक वर्ष जोपसला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

दिवाळीच्या निमित्ताने विखे पाटील कुटूबियांच्या वतीने शिर्डी मतदार संघात साखर वाटप कार्यक्रमात खा.डाॅ सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी प्रवरानगर, बाभळेश्वर आणी पाथरे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

शिर्डी मतदार संघ हा कायमचं विखे पाटील यांच्या सोबत राहिला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी. आपल्या सोबत सर्वाना आनंद साजरा करता यावा हाच मोफत साखर वितरणांचा आहे असे डाॅ.विखे पाटील यांनी सांगून कारखान्याच्या माध्यमातून ऊस उच्चांकी भाव दिला. पुढील वर्षीचा भावही जाहीर केल् असल्याचे स्पष्ट करून महिलांसाठी मोफत पंढरपूर आणि तुळजापूर दर्शन, राष्ट्रीय वयोश्री योजना अशा विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आधार दिला जात असून जनतेचे प्रेम आणि आशिर्वादाने यामुळे हे उपक्रम राबविणे शक्य झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मतदार संघात अनेकांनी संकटे आणली पण जनतेचे आशिर्वाद कायम सोबत होते त्यामुळे सकंट आपण परत पाठवू शकलो. निवडणुकी पुरता कोणताच आपला उपक्रम नसतो तर जनतेबरोबर राहत समाजकार्यावर भर देत उपक्रमकामामुळे जनता कायम सोबत आहे हेच आमचे वैभव असल्याचे सांगून प्रत्यक्ष कृतीतून काम होत आहे.

शिर्डी मतदार संघातील एक लाख कुंटुंबाला मोफत साखर देत असतांना त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा आनंद वेगळाचं आहे निवडणूकीपुर्ते वाटप न करता गोरगरिब जनतेला आधार देण्याचा प्रयत्न झाल्याने जनता कायम बरोबर आहे.आता पाहुण्यांनाही दिवाळीला बोलवा त्यांचेही तोंड गोड करा असे ही डाॅ.विखे पाटील म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!