spot_img
spot_img

साखर वाटपच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम – खा. डॉ. सुजय विखे पाटील शिर्डी मतदारसंघात साखर वितरणाचा शुभारंभ

राहाता दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी मतदार संघातील तीन दिवसात एक लाख लोकांना साखर वितरण होणार आहे. शिर्डी मतदार संघ आमचे कुटूंब आहे. राजकारणाच्या पलीकडे जावून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांंनी केले.

विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावली निमित्त 5 किलो मोफत साखर देण्याच्या योजनेचा शुभारंभ अस्तगावसह विविध गावांमध्ये करण्यात आला. येथील सावता मंदिराच्या प्रांगणात झाला. त्याप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सरपंच सविता चोळके, वाल्मिकराव गोर्डे, नंदकुमार गव्हाणे, नंदकुमार जेजुरकर, गणेश चे माजी संचालक विजय गोर्डे, बाजार समितीचे संचालक संतोष गोर्डे, सुर्यकांत जेजुरकर, निवास त्रिभुवन, बाबुराव लोंढे, केशवराव चोळके, इलाहिबक्स तांबोळी, नवनाथ नळे, रविंद्र जेजुरकर, अविनाश जेजुरकर, बशीर शेख,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यंदा दिवाळीला मतदार संघातील कुटूंबांंना साखर द्यावी असे महिन्यापासुन मनात होते. त्यामुळे एक महिन्यापासुन साखरेच्या पाच किलोेचे पॅकिंग करण्याचे काम सुरु होते, असे सांगुन खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, गणेश परिसरातील ज्यांनी गणेश ला विरोधी मतदान केले त्यांनाही आपण 2700 रुपये भाव दिला. हे फक्त ना. राधाकृष्ण विखे पाटीलच करु शकतात. वैचारिकतेचे काही लोक आहेत, त्यांंना विखे पाटलांनी दिलेले पैसे चालतात, विखे पाटलांची साखर चालते परंतु विखे पाटील चालत नाही. ठिक आहे परंतु हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. गणेश वरील आपली सत्ता गेली, पण या भागातील जनतेशी ॠणानुबंध आहेत. हे संबंध टिकविले. हे संबंध एखाद्या संस्थेमुळे नाहीत. जन्माचे नाते, माणुसकीचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

विखे पाटील परिवारासाठी हा राहाता तालुका जेवढा जवळ होता तो आजही तेवढाच जवळ आहे. या राहाता तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आमच्याचा परिवारातील आहे.

देवदर्शन महिलांचे झाले, पुरुषांनी नाराज होवु नका, तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी नेऊ, ना. विखे पाटील हे राज्यातील एकमेव मंत्री आहेत, त्यांनी मतदार संघातील प्रत्येक घरात मंत्री झाल्यानंतर मोदकाचे पेढे पाठविले होते. पेढेचा आनंद हा मंत्री आणि मुलगा झाल्याचा आनंद होता. आमच्या कुटूंबाचा आनंद मतदार संघातील प्रत्येकाचा आनंद! मराठी शाळेतील मुलांना जेवणाचे डबे दिले. कोव्हिड च्या काळात किराणा किट वाटल्या. गणेश सारखी संस्था हातातुन गेले त्याचे वाईट वाटले नाही, संस्था येतात, जातात. जपतो ती माणुसकी, ॠणानुबंध!

कोण काय आरोप करते, त्या विषयी आपल्याला काही बोलायचे नाही. हा कार्यक्रम राजकिय नाही, म्हणुन काही बोलणार नाही. मला बोलायचे तेंव्हा त्यांच्या घरात जावुन बोलेले. या मतदार संघातील जनतेच्या अशिर्वादाने ना. विखे पाटील मताधिक्याने विजयी होतात. या मतदार संघातील जनतेची दिवाळी गोड व्हावी, प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, हा आमचा परिवार आहे. स्वातंत्र्यनंतर जवाहरलाल नेहेरुंपासुन नरेंद्र मोंदी पर्यंत सर्व पंतप्रधान या मतदार संघात आले, हे केवळ तुमच्या प्रेमामुळे, अशिर्वादामुळे! किमया सर्वांच्या प्रेमामुळे साधता येते. दर दोन महिन्याला चांगल्या चांगल्या गोष्टी मतदार संघात आणु, मतदार संघातील जनतेमुळे विखे पाटील राज्यात क्रमांक दोन चे मंत्री आहेत. एवढं सगळं मिळाले! मतदार संघातील जनतेच्या साठी करणार आहोत. सहा महिने थांबा या मतदार संघात महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत येथे आणणार आहोत.१० हजार मुलं सहा महिन्यात नोकरीला लावणार, असेही खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!