9.9 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांचा भू संपादनाचा मावेजा लवकरच खात्यावर जमा होणार – खा.डॉ.सुजय विखे पाटील

अहमदनगर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):- पैठण ते पंढरपूर पालखी मार्गासाठी नगर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भू संपादित केलेल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या भू संपादनाचा मावेजा लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
जिल्हाधिकारी कार्यालयात पैठण ते पंढरपूर, एनएच 22 या महामार्गाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 
  यावेळी आढावा घेत असताना पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गा वरील भू संपादनाचे काम झाले असून शेतकऱ्यांचा संपादनाचा मावेजा अद्यापही काही तांत्रिक त्रुटी मुळे बाकी आहे, ह्या त्रुटींची माहिती घेवून त्या तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तर एनएच-22 या महामार्गाचे काम अधिक गतीने होण्यासाठी आवश्यक त्या बाबी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात , तसेच मावेजा साठी निधीची उपलब्धता करून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशा सूचना देवून महामार्गाचे काम हे उच्च प्रतीचे करावे असे आदेश दिले. 
  
 भू संपादानासाठी काही अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले त्यावर संबंधितांशी बोलून त्यावर मार्ग कसा काढायचा हे सांगितले. 
कृषी, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, भूजल सर्वेक्षण महामार्ग प्राधिकरण यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची या बैठकीत उपस्थिती होती.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!