लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना मानव जातीस सामोरे जावे लागत आहे आधुनिक काळात वैद्यकशास्त्रामध्ये अनेक उपचार पद्धती उपलब्ध असल्या तरी आजार होऊन उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी आयुर्वेदातील दर्शविलेल्या दिनचर्यास अनुसरून आचरण केले तर होणाऱ्या संभाव्य आजारापासून प्रतिबंध घातला जाऊ शकतो उपचारापेक्षा प्रतिबंध गरजेचा आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिनचर्या आणि ऋतुचर्येचे पालन केल्यास शरीर सुदृढ आणि आरोग्य संपन्न राहते यासाठी आयुर्वेदातील उपलब्ध ज्ञानाचा प्रचार व प्रसार आणि जागृती होणे आवश्यक आहे . निरामय आरोग्यासाठी संतुलित दिनचर्या गरजेची आहे असे प्रतिपादन डॉ .महेंद्र बोर्डे यांनी केले.
डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद कॉलेज राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या अनुषंगाने “दिनचर्या” आयुर्वेद प्रमाणे दिनचर्या या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पायरेन्सचे संचालक डॉ. निलेश बनकर आय बी एम ए चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थित होती डॉ. उज्वला कड यांनी आयुर्वेदात दर्शविल्याप्रमाणे आपली दिनचर्या कशी असावी यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास डॉ.अश्विनी बोरा डॉ. अमृता वेल्दे डॉ. अविनाश वाणी डॉ शोभा तांबे डॉ. अमित विलायते प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा.योगेश आहेर प्रा.धनंजय बोऱ्हाडे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. रेणुका तनपुरे प्रा. पूजा परजणे याचबरोबर डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि पायरेन्स आयबीएमचे यांचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 629354