लोणी दि.३( जनता आवाज
वृत्तसेवा ):- लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्दच्या एम एस्सी ऑगॅनिक वर्गातील पाच विद्यार्थ्यांची नुकतीच आरती ड्रग्स प्रा.ली.भोसरी या नामांकित कंपनीत निवड झाली. अशी माहीती
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांनी दिली.
यामध्ये शुभम जगन्नाथ आहेर, ऋषिकेश भाऊसाहेब नांगरे, निलेश सुनील कदम, पंकज गोरक्षनाथ सिनारे, शुभम जालिंदर मुसमाडे अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिसदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, आश्वी महाविद्यालयाचे कॅम्पस संचालच डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य व सर्व प्राध्यापकासह विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्रा. मोईन पटेल यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
एम. एस्सी या पदवीत्तरस्तर अभ्यासक्रमाची महाविद्यालयाची ही पहिलीच बॅच असून पहिल्याच प्रयत्नात पाच विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच यश प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे उपक्रमशील कॅम्पस संचालक डॉ. राम पवार यांच्या प्रयत्नाने मागील वर्षीपासून महाविद्यालयात पदवीत्तरस्तरावर एम.एस्सी. व एम.कॉम, हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले होते. महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले भवितव्य घडवत असल्याचे समाधान त्यांनी या वेळी व्यक्त केले.
प्रवरेने आश्वी येथे महाविद्यालय सुरु केल्यानेच मला शिक्षण घेता आले. आज मला नोकरी ही मिळाली हे स्वप्न पुर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे – निलेश कदम




