लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):–शिर्डी मतदार संघातील दुर्गापूर ग्रामपंचायती च्या लोकनियुक्त सरपंचपदी विखे पाटील प्रणित जनसेवा युवा परिवर्तन मंडळाचे नानासाहेब अण्णासाहेब पुलाटे यांचा मोठ्या मताधिक्काने विजयी झाला असून याच मंडळाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य अगोदरचं बिनविरोध आले होते.
या निवडणूकीत एकूण १७५१ इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, युवा नेते खा. डॉ. सुजय विखे पाटील, डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणूकीत जनसेवा युवा परिवर्तन मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार नानासाहेब अण्णासाहेब पुलाटे १३८४ यांनी मते घेतली तर जनसेवा मंडळाचे अंबादास गेणू पुलाटे आणि अपक्ष उमेदवार संतोष शिवाजी जाधव यांचा पराभव केला सुधाकर शिवाजी पुलाटे . सौ वर्षा राहुल कदम .सौ सुनीता शाम बोरसे सौ प्रमिला भिमराज पुलाटे. दादासाहेब रामभाऊ मनकर,नबाजी हौशीराम रोकडे .सौ सुशीला बापूसाहेब पुलाटे ,मुकेश बाळासाहेब तांबे आणि सौ. शालिनी कैलास सातपुते युवा परिवर्तनचे सदस्य या अगोरदचं बिनविरोध निवडून आले.
हा विजय जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्याचा आहे. सर्वाना बरोबर घेऊन दुर्गापूर स. सो. सारखा पारदर्शक कारभार दुर्गापूर ग्रामपंचायत चा देखील असेल आणि विकासाभिमुख कामे करुन सर्वाना विकासांत सहभागी करुन गोरगरीब जनतेचे प्रश्न ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करु असे सांगून जनसेवा युवा परिवर्तन पॅनल च्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वाचे आभार नव निर्वाचित सरपंच नानासाहेब पुलाटे यांनी मानले.




Total Users : 629323