राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र शासनाने दीपावली निमित्त सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा शिरा देण्याचे ठरवले होते याबाबत नुकतीच घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली होती.
त्यानुसार आज साकुरी येथे सदरील आनंदाचा शिदेचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे या शिद्यांमध्ये एक किलो हरभरा डाळ एक किलो साखर एक लिटर तेल अर्धा किलो रवा व अर्धा किलो बेसन पीठ असे साहित्य देण्यात येत आहे महाराष्ट्र सरकार हे वर्षातून पाच वेळेस वेगवेगळ्या सणाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वितरित करीत असते दीपावली निमित्त या शिदेचे वितरण आज साकुरी येथे करण्यात आले यावेळी साकुरीचे सरपंच सौ मेघना दंडवते ,श्री संदीप दंडवते, उपसरपंच श्री रावसाहेब बनसोडे, शिवसेनेचे श्री पुंडलिक बावके,प्रकाश डांगे, दिनकर बावके बावके, साकुरीचे ग्रामविकास अधिकारी श्री महाजन श्री राजेंद्र रोहोम,श्री राहुल बावके, आदी सह साकुरीरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते




Total Users : 629153