spot_img
spot_img

प्रवरेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.गायकर यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार प्राप्त सलग दुसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त

लोणी दि.९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकर यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२१-२२ जाहिर करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.विशाल केदारी यांनी दिली.

महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारीत राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासुन सुरु करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवण्यात आले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकर यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफ़ारशीनुसार राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१९-२० ते २०२१-२२ शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच समाजपयोगी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ कार्याचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकर यांना दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार २०२१-२२ दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयात जाहिर करण्यात आला आहे. महात्मा फुले विद्यापीठाचे रा.से.यो चे संचालक डॉ.महावीरसिंह चौहान आणि प्रवरेच्या कृषी शिक्षण संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व सलग्नीत महाविद्यालये, लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमांतून विविध उपक्रम राबविले जातात. डॉ. प्रविण गायकर यांनी शैक्षणिक कार्यक्रमासोबतच समाजपयोगी कार्यातून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. गायकर यांना जाहिर करण्यात आला. यापूर्वीही डॉ.प्रविण गायकर यांना सदर पुरस्कार प्राप्त झालेला आहे यामुळे ते सदर पुरस्काराचे दुसऱ्यांदा मानकरी झाले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत कुमार पाटील, संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, कृषी शिक्षण संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी डॉ.प्रविण गायकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!