spot_img
spot_img

घराचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ!सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-

घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेर वरून पैसे आणावे तसेच शारीरिक छळ केल्या प्रकरणी राहाता पोलीस स्थानक मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की राहाता परिसरामधील एका मुलीचे लग्न जानेवारी २३  मध्ये नाशिक येथील विजय सुखदेव हांडे याचे सोबत झालेले होते परंतु लग्न झाल्यापासूनच नवरा मुलाची बहीण,भाऊ,व आई या नवविवाहितेला माहेरून नवीन घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी दहा लाख रुपये आणावे.

म्हणून सतत छळ करत होत्या तसेच तिला मारहाण पण करत असे याबाबत नववधूने आपल्या माहेरी ही गोष्ट सांगितली परंतु माहेरच्या लोकांनी सुद्धा सासरच्या लोकांची समजूत घालून सुद्धा सासरचे लोक घराचे कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावे म्हणून अडून बसले होते.

तसेच सदरील नवविवाहितेला मारहाण करत असत तसेच सदरील नवविवाहितेला जेवण सुद्धा देत नसत तसेच मुलगी माहेरी फोन करायचा म्हणल्यास त्यास सासरचे लोक मज्जाव करत होते याबाबत पीडितेच्या नातेवाईक यांनी राज्याचे पोलीस महासंचालक,मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे कडे न्याय मिळावा.

म्हणून मागणी याबाबत मा पोलीस अधीक्षक अहमदनगर येथील भरोसा सेल मध्ये 2 ते 3 वेळेस सुनावणी होऊन मार्ग न निघाल्यामुळे सदरील प्रकरण न्याय विभागाकडे गेले त्यानुसार आज राहाता पोलीस स्थानक मध्ये सदरील पीडितेची सासू मीना सुखदेव हांडे,पती विजय सुखदेव हांडे,दीर अजय सुखदेव हांडे,नणंद रोहिणी गणेश देशमुख सर्व राहणार नाशिक यांचे विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायदा भा द वी कलम ४९८अ , ३४ , ५०४ , ५०६  नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८६ / २०२३  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री.पो.ना.गडाख करत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!