अहमदनगर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर येथील सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटणारी टोळी पकडली. या टोळीकडून सोन्याचांदीचे दागिने, गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
संगमनेर येथील सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटणारी टोळी गजाआड करण्यात अहमदनगर एलसीबी पथकाला यश
खंडेश्वर रमेश ठोंबळ (वय 23, रा. आंत्रे, शहरटाकळी, ता. शेवगांव), आकाश बाळासाहेब चौधरी (वय 23, रा. रांजणगांव, ता. शेवगांव), प्रमादे रावसाहेब गायकवाड ( वय 33, रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता मुळ रा. पढेगांव, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सुचनेनुसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पोकॉ शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, अमृत आढाव व प्रशांत राठोड यांच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.