लोणी दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-पायरेन्स लोणीच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तसेच श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या सौजन्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुर्वेद सर्व रोगनिदान आणि चिकित्सा शिबीर तसेच एकदिवसीय पंचकर्म शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहीती संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर यांनी दिली.
शुक्रवार दि. २४ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लोणी येथील आय.टी.आय. कॅम्प येथे होणाऱ्या या शिबीरामध्ये संधीवात, मधुमेह, सर्दी आणि खोकला, त्वचा रोग, बाल रोग, स्त्रीरोग,सोरायसीस,पॅराॅलिसिस, दमा,अम्लपित्त, अपचन, मुळव्याध, मुतखडा,वंध्यत्व, मानसविकार, केसांच्या समस्या, भगंदर, बी.पी. ह्रदय रोग, अम्लपित्त, वजन वाढविणे / वजन कमी करणे, आदीसह शिबीरांच्या माध्यमातून सात दिवसांचे औषधे आणि एक दिवसांचे मोफत पंचकर्म सुविधा असणार आहेत. तज्ञांच्या माध्यमातून होणा- या शिबीरांचा गरजूनीं लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




Total Users : 630727