नेवासा फाटा( जनता आवाज
वृत्तसेवा ):-नेवासा येथील मुळा एज्युकेशन संचलित, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने येथील विद्यार्थ्यानी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळयाचे आयोजन केले होते.
यावेळी वारकरी वेषभूशा आणि टाळ मृदंगाच्या गजरात भगवे झेंडे हाथी घेऊन हरिनामाचा गजर करीत ज्ञानदीप हायस्कूल ते पावन गणपती मंदिर हे अंतर पायी चालत अत्यंत भक्तीमय अशा वातावरणात बालगोपाळांनी पार पाडले. यावेळी संपूर्ण परिसर टाळ मृदूंगाने दुमदूमून गेला.
यावेळी शाळेचे प्राचार्य सतिष डिके यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर दरंदले, देवदत्त दरंदले, दिलीप सरोदे, विवेक पडोळ, सौ. कोमल शिंदे, सौ. कांचनमाला राजळे, सौ. मनिषा देवळालीकर, सौ. माधुरी बोराडे, सौ. गितांजली येवले ,सौ. सुनंदा कोल्हे ,सौ. मंजुषा चरखंडे व मंजुश्री ढाकणे यांनी दिंडीचे उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद लुटला आणि फराळाच्या कार्यक्रमाने दिडीची सांगता झाली.