नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पना सतीश निपुंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवड कार्यक्रमात सौ. भारती अशोक करडक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध करण्यातआली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डि.ए.घोडेचोर साह्यक निवडणूक, अधिकारी बाळासाहेब कासार यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक संतोष खंडाळे यांनी साह्य केले. या निवडीनंतर सरपंच व उपस्थित ग्रामस्थांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना सौ. करडक म्हणाल्या की, मुकींदपुर गावत नागरीकरण वाढत असुन रस्ते, विज, पिण्याचे पाणी या मुलभूत सुविधांन बरोबर, नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करणार तसेच माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सरपंच व सर्व सदस्यांचे आभार.
यावेळी जनसेवा पॅनलचे प्रमुख माजी सरपंच दादासाहेब निपुंगे ग्रामपंचायत सदस्य,कानिफ गोरक्षनाथ कराडे, मंजना प्रसाद खंडागळे सुनिता संजय निपुंगे, प्रताप प्रकाश हांडे, वर्षा बाळासाहेब केदारे, विनायक नारायण शिरसाठ, दिपक चंद्रकांत डमाळे, विजय दत्तात्रय कांबळे, नंदा अरुण निपुंगे, मंदाबाई प्रकाश इंगळे, सुनिता भिमराज उपळकर, अमोल घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



