लोणी दि.२९ ( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थी प्रणय प्रकाश देरिंगे याने एम. बी. ए. सी. ई. टी. या परीक्षेत ९१% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले
असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे यांनी दिली आहे. प्रणव देरींगे यास या कामगिरी मुळे मुंबई येथील नामांकित संस्थेमध्ये पुढील शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्याच्या या यशामध्ये त्यास पदव्युत्तर पदवी समन्वयक डॉ. ज्योती झिरमिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रणव याच्या या यशाबद्दल
संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ. किरण गोंटे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आदींनी अभिनंदन केले आहे.