सोनई( जनता आवाज वृत्तसेवा):- सोनई हे गाव अतिशय सुसंस्कृत माञ सध्या येथे अवैध धंदाचे माहेर घर बनत चालले आहे.विनापरवाणा देशी विदेशी दारू विक्री, मटका, जुगार ,अवैध गौण खणीज वाहतुक,चंदन तस्करी,अवैध प्रवासी वाहतुक असे अवैध धंदे जोरात सुरू असुन सोनई पोलिसांनी माञ झोपेचे सोंग घेतले आहे.सोनईचे सहायक पोलिस निरिक्षक माणिक चौधरी फक्त शालेय महाविद्यालयातील विघार्थी वर्गाच्या गाडयाच्या मागे लागुन वेळ घालवत आहे.याकरिता वाहतुक पोलिस आहेत याचे भान ठेवून जबाबदार अधिकारी म्हणुण समजले पाहिजे.चौधरी साहेब जरा सोनई परिसरातील अवैध धंदाकडे पण लक्ष दयावे अशी मागणी सोनई परिसरातील सुज्ञ नागरिकांची आहे.
सोनई गाव व परिसरात सध्या अवैध व्यवसायांनी धुमाकुळ घातला असुन सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांची पोलिस यंञणा कुचकामी ठरत आहे.सोनई परिसरात सध्या राञी अपराञी गौण खणीज व चोरटी वाळु वाहतुक सुरू आहे.सोनई गावात मटका जुगार हे अवैध धंदे जोरात सुरू असुन बिट पोलिस कधीच जागेवर सापडत नाही.सोनई बिटचे हवालदार हे कुठे असतात गावात काय धंदे चालतात याकडे सध्या त्यांचे पुर्णे दुर्लेक्ष आहे.गावात अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री धंदे जोरात सुरू असुन सोनई पोलिस हे माञ मांजर डोळे झाकुण दुध पिते तसे ढिम्म झाले असुन आता सोनई परिसरातील नागरिक माञ पोलिस अधिक्षक साहेबांकडे तक्रार करणार आहेत.सोनई पोलिसांनी लवकरात परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावेत अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.



