spot_img
spot_img

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने सुरेश वाबळे यांना सन्मानित

 राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष व इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या हस्ते मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र व रोख ११हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा फलटण व श्री सदगुरू  प्रतिष्ठान फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीदिनी एक दिवशीय मराठी साहित्य संमेलन फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात काल पार पडले. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील मल्टिस्टेट संस्थेच्या फेडरेशन मार्फत प्रेरणाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी उल्लेखनीय कार्य करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडे पतसंस्था,मल्टिस्टेट चे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पतसंस्था चळवळीचे निकोप विस्तारासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेवून त्यांची या पूरस्कारासाठी निवड केली गेली.

स्व.यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पूरस्काराने सन्मानित होणे हा आयुष्यातील मोठा भाग्याचा क्षण असल्याचे पूरस्काराने सन्मानित झाल्यावर सुरेश वाबळे यांनी सांगितले.सुरेश वाबळे यांना याच वर्षी अँग्रोवन चा युवा उद्योजक पूरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!