spot_img
spot_img

पारनेर मधील माय लेकराच्या हत्याप्रकरणी एका आरोपीस अटक पारनेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच  आरोपीच्या आवळल्या मुसक्या आरोपीस २९  नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर येथील जागेच्या वादातून कारखाली चिरडून माय-लेकाची हत्या केल्याप्रकरणी किरण राजाराम श्रीमंदिलकर (वय २५, कुंभार गल्ली, पारनेर) यास पारनेर पोलिसांच्या पथकाने अटक केली. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी ही माहिती दिली.

पारनेर शहरानजिक कान्हर पठार रस्त्यावर शनिवारी (२५) नोव्हेंबर) पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रथमदर्शनी अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात हत्येचा सुनियोजित कटअसल्याचे निष्पन्न झाल्यावर व त्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तास्सात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अटक करणाऱ्या पथकात पोलीस हवालदार संजय लाटे,गहिनीनाथ यादव,सागर धुमाळ,जालिंदर लोंढे, विवेक दळवी,सारंग वाघ, दीपक केतके, सुधीर खाडे ,मयूर तोडमल यांचा समावेश होता.

गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी श्रीमदिलकर याने शेजारी राहणाऱ्या शीतल येणारे व त्यांच्या अडीच वर्षांच्या स्वराज या मुलाला भरधाव वेगात कार अंगावर घालून चिरडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शीतल यांचा नगर येथील शासकीय रुग्णालयात, तर स्वराजचा विखे पाटील रुग्णालयात उपचारादरम्यानमृत्यू झाला. मृत शीतल यांच्या सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून, तसेच परिस्थितीजन्य पुराव्यावरून पारनेर पोलिसांनी आरोपी किरण श्रीमंदिलकर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. माय-लेकाची निघृण हत्या केल्यानंतर, त्यांना चिरडण्यासाठी वापरण्यात आलेली पोलो कार (क्रमांक एमएच १२ आरटी २७७७) शहरातच सोडून आरोपी फरार झाला झाला होता सदर घटनेस आरोपीला अटक करण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस स्टेशन प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या पथकातील पोलीस हवालदार संजय लाटे,गहिनीनाथ यादव, जालिंदर लोंढे, विवेक दळवी,सारंग वाघ,सागर धुमाळ, सुधीर खाडे दीपक केतके, मयूर तोडमल आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!