लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेत्यांचा वाढदिवस गरजूंच्या कामी यावा म्हणून त्यांचे हितचिंतक विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. लोणीचे बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक धावणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून खा. सुजय विखे पाटील यांची ज्ञानतुला करीत त्यांच्या वजनाएवढ्या वह्या विविध शाळांच्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप करून आगळावेगळा उपक्रम राबविला.
विळदघाट येथील शैक्षणिक संकुलात आयोजित केलेल्या वाढदिवस कार्यक्रमात दीपक धावणे यांनी खा. सुजय विखे पाटील यांची ज्ञानतुला करून त्यांच्या वजनाएवढ्या वह्या दीपक धावणेंकडून खा. विखेंची ज्ञानतुला; वजनाएवढ्या वह्यांचे वाटप ज्ञानतुला केल्यानंतर वह्यांच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करताना खा. विखे. समवेत दीपक धावणे व मान्यवर.लोणी येथील गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना वाटप केल्या. यावेळी धनंजय आहेर, अक्षय तांबे, प्रतीक तांबे, अजिंक्य आहेर, संदीप खर्डे, किरण ढगे, रवींद्र धनवटे आदी उपस्थित होते.
खा. विखे यांचा वह्यांच्या मुखपृष्ठावर छापलेला फोटो विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षणही ठरला. वह्या मिळाल्याचा आनंदही या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दीपक धावणे गेल्या दहा वर्षांपासून वह्या आणि शालेय साहित्याचे विविध शाळांमध्ये वाटप करीत आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचे ना. विखे, आ. अण्णासाहेब म्हस्के, डॉ. राजेंद्र विखे, शालिनीताई विखे व खा. डॉ. सुजय विखे यांनी नेहमी कौतुक केले आहे. नेत्यांचे वाढदिवस समाजातील गरजवंतांची गरज भागविण्यास सहाय्यभूत ठरावेत यासाठी असे उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दीपक धावणे यांनी दिली



