spot_img
spot_img

सुदर्शन प्रीमियर लीग 2023 चा विजेता ठरला “पसायदान स्पोर्ट्स क्लब”

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील मानाची सुदर्शन क्रिकेट अकादमी आयोजित सुदर्शन प्रीमियर लीग २०२३ ची १७ वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धाचा विजेता निलेश खंडाळे आणि संदीप वीर यांच्या मालकीचा पसायदान स्पोर्ट्स क्लब या संघाने पटकाविला.

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर कॉलेज मैदानावर मागील ३ दिवसापासून चार संघामध्ये हि स्पर्धा रंगली होती.अंतीम सामना संभाजी पवार यांच्या मालकीचा पॉवर इंडियन्स आणि पसायदान यांच्यात रंगला.

नाणेफेक जिंकून पसायदान संघाने प्रथम फलंदाजी करत ३० षटकात २४२ धावा केल्या त्यात जयदीप काळे याने १०० धावा केल्या तर रुद्र जगताप याने ३८ धावांची सुंदर खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.

तर धावांचा पाठलाग करताना पॉवर इंडियन्स संघाकडून आयुष कुसळकर आणि सुजित नेहुल यांनी अर्धशतके झळकावली. अंतिम षटकात २० धावा जिंकण्यासाठी लागत असताना सुजित नेहुल याने आपल्या चौफेर फटकेबाजी करत विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले परंतू तो सामना अवघ्या ५ धावांनी पसायदान स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकला.

हा सामना पाहण्यास भरपूर क्रिडा रसिकांची गर्दी होती. बक्षीस वितरणासाठी नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ खेळाडू संदीप कुसळकर, पारखे साहेब, कानडे साहेब, रक्ताटे साहेब, समीर सर, कांदे साहेब, संभाजी पवार ,सुनील पवार, निलेश खंडाळे, संदीप वीर आदी पाहुणे उपस्थीत होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदर्शन क्रिकेट अकादमीचे संस्थापक आणि प्रशिक्षक इम्रान सर यांनी खुप मेहनत घेतली आणि अशी लेदर बाॅलवरील ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा प्रथमच नेवासा येथे पार पडली. क्रिकेट विश्वात भविष्य घडवू पाहणाऱ्या नेवासा तालुका येथील खेळाडूंना आयपीएलच्या धर्तीवर एस पी एल क्रिकेट स्पर्धे मार्फत संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल क्रिकेटचे प्रशिक्षक इम्रान सर यांचे अहमदनगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. व या स्पर्धांमुळे नेवासा तालुक्याच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे. तसेच इथून पुढील काळात खेळाडूंचे भविष्य उज्वल असेल व सुदर्शन क्रिकेट अकादमीतून भविष्यात मोठे खेळाडू घडोत अशी इच्छा प्रशिक्षक इम्रान सर यांनी बोलून दाखवली.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!