spot_img
spot_img

लोणीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये यश.

लोणी दि.२९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी कु. साक्षी पाटील आणि कु. वैष्णवी कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित विभाग स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली आहे .

या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पास प्राध्यापक गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, सदर पुरस्कार प्राप्त विद्यार्थी छत्रपती संभाजी नगरचे विद्यापीठ स्तरीय प्रतिनिधित्व करणार आहेत या स्पर्धेमध्ये एकूण ४० महाविद्यालयातील ४० प्रकल्प स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते व सदर ४० प्रकल्पातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक या महाविद्यालयाने प्राप्त केले आहे.

महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त व माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे ,संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ व तांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, फार्मसी इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर डॉ. बी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!