spot_img
spot_img

सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडविणारे ज्योतिबा फुले खऱ्या अर्थाने महात्मा -डॉ.मोहसीन तांबोळी

लोणी दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा ):-महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी महात्मा फुले यांनी केली सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. समाज हितासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ज्योतिबा फुले खऱ्या अर्थाने महात्मा आहेत असे प्रतिपादन डॉ.मोहसीन तांबोळी यांनी केले.

पायरेन्स आयबीएम ए मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पायरेन्सचे सचिव व संचालक डॉ.निलेश बनकर,पायरेन्स आय बी एम ए मधील डॉ. मनोजकुमार लंगोटे प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा .सौरभ दिघे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. योगेश आहेर प्रा. निलेश आवारी प्रा. धनंजय बोऱ्हाडे प्रा. रेणुका तनपुरे प्रा. रणीता वलवे प्रा. पूजा परजणे प्रा. संजय औताडे प्रा. प्रमोद गोपाळे प्रा. प्रशांत गोर्डे, कार्यालयीन अधीक्षक रावसाहेब कानडे याचबरोबर पायरेन्स आय बी एम ए मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि एम बी ए, एमसीए, बी व्होक या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!