spot_img
spot_img

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

सोनई ( जनता आवाज वृत्तसेवा ):- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीगुरुवारी दुपारी शनिशिंगणापूर येथे येऊन शनि दर्शन घेतले . सुरेक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .देशाच्या राष्ट्रपतींने शनि दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे . 

राष्ट्रपती यांचे मंदिर परिसरात आगमन झाल्यावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी स्वागत केले . मंदिर परिसरात त्यांचे आगमन झाल्यावर जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले त्यानंतर उदासी महाराज मठात पुजाऱ्यांनी मंत्रघोषात अभिषेक केला . व राष्ट्रपती यांनी चवथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीस तेल अर्पण केला . अध्यक्ष भागवत बनकर ,उप अध्यक्ष विकास बनकर यांनी शाल , श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन राष्ट्रपतींचा सन्मान केला . दर्शन झाल्यावर जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपतीनी प्रसाद लायचे महाराष्ट्रीयन जेवण घेतले .

संपूर्ण शिंगणापूर परिसरात मोठं मोठे बेरेकेटिंग केले होते . सर्व वाहनतळ बंद करण्यात आले होते . गेल्या दोन दिवसापासून शिंगणापूर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल , पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

 राष्ट्रपती यांचा शनि अभिषेक झाल्यावर ज्या वेळेस त्या जनसंपर्क कार्यालयात आल्या त्यावेळेस सोबत असणाऱ्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून तेलाचे पैसे दिले . ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच मंदिर परिसरात येऊ दिले जात होते . 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!