सोनई( जनता आवाज वृत्तसेवा ):-जगप्रसिद्ध श्रीक्षेञ शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करुन हे देवस्थान सरकार जमा करण्यात यावे आणि या जगप्रसिद्ध देवस्थानावर त्वरित प्रशासक नेमण्यात यावा या मागणीसाठी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवार (दि.३०) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून अमरण उपोषण सुरु केले होते.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शेटे व कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला.या उपोषणाला भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,अशोक टेमक,बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर,कांगोणीचे माजी सरपंच बंडूभाऊ शिंदे,सतीष गडाख,संदीप कुसळकर,प्रतिक शेजूळ,सचिन भांड,अमोल साठे,प्रताप चिंधे,नानासाहेब ढेरे,संभाजी गडाख,अरुण चांदघोडे,भाऊसाहेब बेल्हेकर,गणेश चौघुले,काशिनाथ ढेरे,ज्ञानदेव ढेरे,संभाजी राशिनकर,प्रकाश ढेरे, बाळासाहेब साबळे,हर्षद शिरसाठ आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या उपोषणकर्त्यांनी देवस्थान गैरव्यवहार थांबविण्याची मागणी करत देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन देवस्थान सरकार जमा करण्याची एकमुखी मागणी केली आहे.या उपोषणकर्त्यांची केंद्रीय मंञी भागवत कराड व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार (दि.१) रोजी सकाळी १० वाजता उपोषण स्थळी भेट घेतली व देवस्थानच्या कारभाराबाबत उपोषणकर्त्यांकडून
वस्तुस्थिती समजून घेतलेली असून देवस्थान वाचविण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन सरकार जमा करण्याची मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केलेली आहे.याबाबत हिवाळी अधिवेशनात शनैश्वर देवस्थानला न्याय देऊ असे चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनि दर्शन घेवून गेल्यानंतर शेटे हे सहा वाजता उपोषणाला बसले होते
चक्क चंद्रकांत बावनकुळे (प्रदेश अध्यक्ष ) यांनीच घेतले ऋषिकेश शेटे यांचे वकीलपत्र.शिंगणापूर देवस्थान गैरव्यवहार प्रकरणी ऋषिकेश शेटे यांचे वकील म्हणून बावनकुळे हे काम पाहणार आहे व येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडुन शनिशिंगणापूर देवस्थानला न्याय देऊ असे बावनकुळे यावेळी म्हणाले.