नेवासा फाटा (जनता आवाज वृत्तसेवा):-नेवासा फाटा येथील ओम साई सायकलींग ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी सायकल वारीचे ओम साई सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
या ग्रुपचे हे पंढरपूर वारीचे चौथे वर्ष असून या वारी दरम्यान ओम साई सायकलिंग ग्रुप च्या माध्यमातून एकतेचा संदेश व भक्ती भावाचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच सायकल वारीच्या निमित्ताने ग्रुपच्या वतीने प्रत्येकाने सायकलचा दैनंदिन वापर करावा तसेच यामुळे आपले शरीर हे आरोग्यदायी व तंदुरुस्त राहिल. तसेच सायकल मुळे आपल्याला प्रदूषणही टाळता येईल त्यामुळे सायकलचा प्रत्येकाने सर्रास वापर केला पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ओम साई सायकलिंग ट्रेकिंग ग्रुपचे पंढरपूर वारीचे हे चौथे वर्ष असून नेवासा ते पंढरपूर असा 245 किलोमीटरचे अंतर हे सायकलस्वार अवघ्या पंधरा तासांमध्ये पार करतात.
या सायकल वारीमध्ये अध्यक्ष प्रशांत बडाख , भूमिअभिलेखचे उपाधीक्षक चंद्रकांत सेवक, दिलीप गिरी, राजेश शर्मा यांनी सहभाग नोंदवला.



