लोणी दि.२६ (जनता आवाज वृत्तसेवा):-शिक्षण ही सेवा असावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर सेवा हे एकमेव ध्येय ठेवून समाजकार्यातून देश कार्य व देश सेवा करावी असे प्रतिपादन राजेंद्र बनसोडे यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोणी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आशीर्वाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री सोमनाथ बनसोडे हे अध्यक्षस्थानी होते.महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि केंद्रप्रमुख मा. श्री राजेंद्र बनसोडे,प्राचार्या सौ.विद्या वाजे आदी उपस्थित होते.
श्री सोमनाथ बनसोडे यांनी महाविद्यालयीन आठवणी ना उजाळा दिला व शिक्षणामुळे मी इथपर्यंत पोहोचलो म्हणून सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणातून सर्वांचा विकास झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. सुधाकर गोरे सर यांनी आपल्या मनोगत मध्ये शिक्षण हे ध्येय प्रेरित असावे आणि शिक्षक होण्या साठीची प्रेरणा ही मनातून तयार झाली पाहिजेत म्हणजेच एक आदर्श शिक्षक निर्माण होऊ शकतो आणि आदर्श शिक्षक हाच समाजाला वळण लावू शकतो. असे मत व्यक्त केले याप्रसंगी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये महाविद्यालयीन स्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कु. पल्लवी कोकणे, शुभांगी मापारी, अनिसा इनामदार, हे गुणवंत विद्यार्थी उपस्थित राहून यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनी कु. छाया वाघ आणि श्रीराम देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. श्री तुषार कडसकर आणि कु. वाघ छाया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ विद्या वाजे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन भोसले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शोभा रोकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्राा. राजेंद्र मोरे यांनी आभार व्यक्त केले.



