लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्पर्धेतून आणि शालेय कार्यक्रमातून मिळालेले यश हे आपले ध्येय पुर्तीसाठी महत्वपूर्ण असते. यश आणि अपयश यातूनच विद्यार्थ्यांची जडणघडन होत असते. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आपली आवड जोपासून करिअर करा. प्रवरा शैक्षणिक संकुलातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा आज आदर्श ठरत असल्याचा अभिमान आहे. या विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शानातूनच संशोधक निर्माण होतील असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमिल आयोजित विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील बोलत होते. प्रवरा बॅकेचे माजी संचालक किसनराव विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास लोणीच्या सरपंच कल्पना मैड, सदस्या सौ. कविता दिवटे, संस्थेच्या शिक्षक संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक नंदकुमार दळे, संस्थेतील प्राचार्य सर्वश्री डाॅ.राजेंद्र कोबरणे, भारती देशमुख, सयराम शेळके, शिवाजी निर्मळ, भारती कुमकर सुभाष कडू,संजय चितळकर आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात माजी मंत्री म्हस्के पाटील म्हणाले, मुलींच्या शिक्षणात प्रवरा ही अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरचं संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून सक्षम विद्यार्थी घडवितांना प्रवरेचे विद्यार्थी हे जागतिक पातळीवर पोहचले आहेत हाच उद्देश पदमश्री विखे पाटील आणि पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांचा होता आणि त्याची आज स्वजपुर्ती होत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी जिल्हात केलेले काम हा आदर्श आहे. संस्थेत अनेक उपक्रमातून त्या कार्यरत आहे. त्यांना वाढदिवसांनिमित्त शुभेच्छा ही माजी मंञी म्हस्के पाटील यांनी दिल्या.
प्रास्ताविकांमध्ये सौ.लिलावती सरोदे यांनी प्रदर्शनाचा आढावा घेत यामध्ये ४२ शाळांचे २५० विविध प्रयोग आणि कलाकृती ठेवण्यात आल्या.यातून अनेक प्रयोगांची निवडही जिल्हा आणि राज्यपातलीवर होईल असे सांगितले.
या स्पर्धेमध्ये विज्ञान गटात श्रध्दा वाघचौरे,महीन शेख,साजवी सदगिर,सार्थकासाबळे,साई नन्नवरे,साईदिप शेळके,हषर्धन घुगे,शेजल वाणी,श्रेयस राजा यांनी यश मिळविले.गणित गटात काव्या शिंदे,वैभव ठोंबरे,श्रेया साबळे,गिता दिवटे,आरुषी जवरे,रुचिता म्ससे,सानवी विखे,सानिया तांबोळी,सिध्दी गोरे,कला गटात अमृता शिंदे,दिव्या गांगुर्डे,आर्यमान खर्डे,सिध्दी चव्हाण,आदिती शिंदे,प्रिया गायकवाड,भक्ती जाधव अनुराधा लोळगे तर निंबध स्पर्धेत जान्हवी जोशी,निदा पटेल,तनुजा कदम,ईश्वरी प्रधान,प्रतिक्षा चव्हाण,सानिया शेख यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन संजय उंबरकर आणि संजय देशमुख तर आभार संतोष कडू यांनी मानले.