spot_img
spot_img

गोवर्धन येथे गोदावरी नदीपात्रात हवेत गोळीबार वाळू तस्करांकडून अधिकाऱ्यांवर हल्ला

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा)-श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील गोदावरी नदीच्या पात्रात रविवार दि.२५ रोजी मध्यरात्री सुरू असलेली अवैध वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या विशेष वाळु पथकाच्या जिल्हा खनिज अधिकारी वसिम सय्यद यांच्यावर वाळू तस्करांच्या जमावाने हल्ला चढवल्याने त्यांना स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक भगवान कुलथे (वय 55) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की,दि. 25 जून 2023 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयाचे विशेष वाळु पथकाचे जिल्हा खनिज अधिकारी वसिम सय्यद यांनी मला अवैध वाळु उत्खनन करणाऱ्या विरुध्द कारवाई करण्यासाठी सोबत येण्यास सांगितले.त्यांनी दोन पोलिस अंमलदार यांची हत्यारासह मागणी केली होती. त्यावरुन पोहेकॉ श्री.बारवकर व पोना गणेश मोहन शिंदे असे वसिम सय्यद यांच्या सोबत रात्री ९ वा चे सुमारास खाजगी वाहनाने श्रीरामपुर येथे आलो. त्यानंतर दि.26 जून 2023 रोजी पहाटेच्या सुमारास गोवर्धनपुर ता.श्रीरामपुर येथे गोदावरी नदीपात्रात गेलो.
 तेथे पोहचल्यावर आम्हाला एकूण सात डंपर ट्रक गाड्या रांगेमध्ये उभ्या दिसल्या. सदर गाड्यामध्ये काही लोक नदीपात्रातील वाळू भरत होते. आम्ही गाडीखाली उतरुन सदर लोकांना आमची ओळख दिली. तेवढ्यात नदीपात्रातील आजुबाजुला असलेले 50 ते 60 लोक आमच्या दिशेने धावत येवुन आम्हाला दमबाजी करू लागले.औरंगाबादच्या पथकाचे इकडे काय काम आहे, तुमची हिंमत कशी झाली आमच्या गाड्या अडवायची, असे म्हणुन आमच्या दिशेने सर्व गाड्या एकामागे एक भरधाव वेगात चालवुन आम्हाला आम्हाला त्यांच्या ट्रकखाली घालण्याच्या उद्देशाने आमच्या दिशेने चालविल्या. तेव्हा मी व सोबत असलेले श्री.सय्यद, बारवकर व गणेश शिंदे यांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्या ट्रकांना चुकविले. त्यामुळे वाळू तस्करांचा जमाव अधिक भडकला व आम्हाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ते सर्व जणांच्या दिशेने चाल करून आले. तेव्हा वसीम सय्यद यांनी पोहक बारवकर यांना आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी गोळीबार केल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत आदेश देवुन हवेत गोळी झाडण्यास सांगितले. तेव्हा पोहेक बारवकर यांनी त्यांच्या जवळ असलेल्या शासकीय कार्बाईन हत्यारामधुन एक गोळी हवेत फायर केली. 
त्यामुळे आमच्या दिशेने चालुन आलेले वाळू तस्कर व ट्रक ड्रायवर हे त्यांच्या ताब्यातील गाड्या तेथेच सोडून अंधारात पळुन गेले. त्यानंतर श्री.सय्यद यांनी श्रीरामपुरचे तहसिलदार यांना फोन करुन अधिकचे पोलिस कुमक व त्याच्या स्टाफची मागणी केली. त्यानंतर थोड्याच वेळात तहसिलदार श्री. वाघचौरे यांचे पथक घटनास्थळी आले. त्यानंतर सदरचे ट्रक तहसिलदार यांनी ताब्यात घेतले. सहा ट्रक यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे – 1 ) ट्रक नं एम एच 04ई एल 2097 पांढरा रंग अललेला त्याची कि अं 500000/- रु. त्यात एक ब्रास वाळु 2 ) ट्रक नं एम एच 12 एच बी 9555 पांढरा रंग असलेला त्याची कि अं 500000/- रु3) एक बिगर नंबरचा लाल रंगाचा डंपर त्याची कि अं 500000/- रु दोन ग्रास वाळु4) एक बिगर नंबरचा हिरवा निळा रंगाचा ढंपर त्याची कि अं 500000/- रु5) एक बिगर नंबरचा लाल हिरवा रंगाचा डंपर त्याची कि अं 500000/- रु दोन ब्रास वाळु6) एक बिगर नंबरचा लाल पोपटी रंगाचा ढंपर त्याची कि अं 500000/- रु7) एक विना नंबरचा लाल रंगाचा ढंपर त्याची किं 500000 /- रु दोन ब्रास वाळु असा एकूण 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 
तसेच एक ट्रक चालु होत नसल्याने तो तेथेच जवळ असलेल्या सरकारी वाळु डेपोवर उभी केली. जप्त केलेले ट्रक तहसील कार्यालयाछटा आवारात उभे केले. त्यानंतर आमच्यावर नदी पात्रात हल्ला करणा-या लोकांपैकी काही लोक तहसिल कार्यालयाच्या आवारात येवुन आम्ही आणलेल्या ट्रकाचे टायर खोलन घेवुन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्याना पकडले.त्यांनी त्याची नावे विशाल बाळासाहेब खरे वय 20 वर्ष धंदा चालक (हिरव्या रंगाच्या विनानंबरचा ढंपर चालक ) रा. रामपुर ता. श्रीरामपुर जि. अ. नगर, फारुक कम पठाण वय – 23 धंदा चालक (विजु पवार च्या गाडी चा ) रा. जाफ्राबाद ता. श्रीरामपुर, भारत नानासाहेब पांढरे वय 20 धंदा वचर रा. रामपुर ता. श्रीरामपुर,साकिब सईद शेख वय 42 धंदा वचर रा. फातिमा हौसिंग सोसायटी कॉनल रोड . वार्ड नं 2 श्रीरामपुर, प्रमोद जलिंदर चांदणे वय 19 धंदा चालक (फरीब च्या गाडीचा) रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपुर, राहुल शांताराम जाधव वय 23 धंदा मजुर रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपुर, दिनेश अशोक आम्ले वय 20धंदा मजुर रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर अशी सांगितली.
पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी करत गोवर्धन येथिल नदीपात्रात अधिकाऱ्यांच्या वाळु पथकावर हल्ला करणा-याची नावे विचारली असता त्यांनी ती सलिम जहाँगिरदार (पॉईंट चालक),असिफ कैची (निळ्या रंगाचा डंपर मालक ), फरिद (चड्डी ) (MH 12 HB 9555 पर चा मालक ), राजु गुंजाळ, विजु पवार (हिरव्या रंगाचा विनानंबर डंपर मालक) रा. गोंधवणी ता. श्रीरामपुर, विशाल गुंजाळ (हिरया पोपटी रंगाचा डंपर मालक), सलिम कुरेशी ( वचर),वसिम अफसर सय्यद (वचर ) वांजरगाव ता. वैजापुर जि. औरंगाबाद, सुनिल साळवे( मजुर), शफिक शेख (वचर ), राजु मोरे (मजुर) रा. जाफ्राबाद, शुभम खरात (मगर), आंबादास बर्डे (ड्रायव्हर ), गौतम शेळके (वचर ), पवन उपड़कर (वचर), रा. रामपुर ता. श्रीरामपुर , मिलीद धनवटे (वचर), फारुख पठाण (ड्रायव्हर ) अशी  सांगितली.त्यावरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!