सात्रळ, दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कु. सांगळे प्रियंका पुंजाहारी (द्वितीय वर्ष कला) हिची जळगाव येथे होत असलेल्या सात दिवशीय राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी (NIC) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
राष्ट्रीय एकात्मता शिबीर दि. ३० नोव्हेंबर २०२३ पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सुरु झाले असून या शिबिरात देशभरातील २०० स्वयंसेवक व १० कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांच्या संघात कु. सांगळे प्रियंका हिची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव मा. श्री. भारत घोगरे पाटील, शिक्षण संचालक मा. डॉ. पी. एम. दिघे व महाविद्यलय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एम. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, डॉ. दीपक घोलप आणि सर्व सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. प्रियंका सांगळे हिला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, डॉ. निलेश कान्हे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.