कोपरगांव दि. ४( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी कोपरगांव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ, उद्घाटन तसेच रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.
मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी ना. विखे पाटील यांच्या दौऱ्याच्या आयोजनामध्ये सकाळी १० वाजता माहेगांव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन, सुरेगांव येथील वाळू डेपोचा ऑनलाईन शुभारंभ व सभा,दुपारी १२.३० वाजता संवत्सर येथील ग्रामीण रुग्णालयाचा भूमीपूजन सोहळा, दुपारी १ वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील संवत्सर कान्हेगांव वारी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, दुपारी १.३० वाजता संवत्सर येथे दिव्यांग लाभार्थीना साहित्याचे वाटप व शनी मंदिराच्या प्रांगणात सभा, दुपारी ३.३० वाजता गोदावरी खोरे दूध संघाच्या सोलर प्लॅन्टचा पायाभरणी शुभारंभ, दुपारी ४.१५ वाजता स्टेशन रस्त्यावरील लोकनेते नामदेवरावजी परजणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा तर सायंकाळी ५ वाजता कोपरगांव शहरातील निवारा कॉलनीमधील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व सभा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे, तालुक्यातील नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री परजणे पाटील यांनी केले.