लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, लोणी येथील पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. अरुणा झिने यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून पर्यावरणशास्त्र या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.अरुणा झिने यांनी “राहाता तहसीलमधील भूजल गुणवत्तेचे हंगामी मूल्यांकन आणि त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम” या विषयावर संशोधन करून भगवंत विद्यापीठ, अजमेर येथे शोध निबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांना पर्यावरणशास्त्र विभागातील डॉ. अशित दत्ता यांचे प्रमुख मार्गदर्शन तर पर्यावरणशास्त्र चे विभाग प्रमुख डॉ.गोरक्ष पोंधे यांचे सहाय्यक मार्गदर्शन लाभले. सध्या प्रा.झिने अरुणा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, लोणी येथील पर्यावरणशास्त्र या विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
डाॅ.झिने यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोद,प्राचार्य डॉ.रामभाऊ पवार, उप प्राचार्य डॉ.अनिल वाबळे,डॉ.रणपिसे भाऊसाहेब, डॉ.गलांडे, पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. गोरक्ष पोंधे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.