16.3 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

दिनांक 27 जून रोजी दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे वाटप

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-
 केंद्र सरकारच्या एडीप योजने अंतर्गत दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप शिबिराचा शुभारंभ दिनांक 27 जुन रोजी लोणी येथे केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते व महसूल,पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून खा.डॉ.सुजय विखे पाटील व खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 
  

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ७२० दिव्यांग व्यक्तींना लोणी येथील शिवकांता लॉन्स येथे सकाळी साडे दहा वाजता एका समारंभात या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. 
अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र सरकारच्या एडिप योजनेच्या माध्यमातून जिल्हयात 12 दिव्यांग तपासणी शिबिर हे डॉ.विखे पाटील मेडिकल फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात येवून यात ७१४७ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील ७२० दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित दिव्यांग व्यक्तींना तालुका स्तरावर वाटप शिबिर घेऊन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे असे मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!