लोणी दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आणि महसुल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थिनी प्राजक्ता रंजना राठोड हिची अग्निवीर ( एअरफोर्स ) साठी निवड झाली आहे.
संस्थेच्या माध्यमातून पोलिस आणि सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते . यावर्षी कर्मचारी निवड मंडळातर्फे घेण्यात आलेल्या जी.डी च्या परीक्षेत ऋषिकेश बबन तांबे आणि सोनाली खोबरे यांनी यश प्राप्त केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे मुलीनी सर्व क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रमोदींचे सरकार कार्य करीत असून प्राजक्ता राठोड हिचे यश इतर मुलीना प्रेरणादायी ठरेल असे मत ना.विखे पाटील यांनी व्यक्त केले. तर पोलीस, आर्मी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ना.विखे पाटील यांनी एक चांगला मंच दिला यामुळेच हे यश मिळाले आहे.यातून ग्रामीण विद्यार्थी पुढे जात आहे अशी प्रतिक्रिया यावेळी प्राजक्ता राठोड हिने व्यक्त केली.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील,खासदार डॉ सुजय विखे पाटील संस्थेचे अतिरिक्त सचिव भारत गोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्रवरा पोलीस अकॅडमीचे संचालक डॉ.आर.ए. पवार , क्रीडा संचालक डाॅ. प्रमोद विखे यांनी तिचे अभिनंदन केले. यासाठी तिला क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षक डॉ.उत्तम अनाप आणि शिवाजी बुचुडे आणि डॉ शैलेश कवडे-देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.